स्थानिक विद्या प्रसारक मंडळ द्वारे संचालित, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ , येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे ‘नशा मुक्त भारत’ या अभियाना अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानाचा विषय ‘ व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी युवकांची भूमिका ‘ हा होता या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. घनश्याम दरणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.भांडवलकर उपस्थित होते. युवकांनी व्यसनमुक्ती अभियाना मध्ये अग्रनिय सहभाग घ्यावा व देशाचा विकास करावा व कुटुंबाचा सुद्धा विकास व्यसनमुक्ती मुळे होतो असे प्रा. घनश्याम दरणे यांनी आपल्या वक्तव्यातून प्रतिपादन केले व प्रत्येक विद्यार्थी हा नशा मुक्त असला पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य आर.बी भांडवलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यसनाचे गंभीर्य युवकांनी लक्षात घ्यावे व याचे आहारी जाऊन आपले शारीरिक ,आर्थिक व मानसिक ,नुकसान करू नये व आपल्या कुटुंबाचे समाजाचे जबाबदार युवक म्हणून रक्षण करावे असे म्हटले, आणि महाविद्यालयातील युवकांना व्यसनमुक्ततेची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत राठोड कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ किशोर बुटले, डॉ, प्रवीण जाधव डॉ, सरिता सिंधी डॉ. सुलोचना लांजेवार प्रा. संजय पंदिरंवाढ व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुचिता वानखेडे महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले . डॉ. मुद्देलवार सह -कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .