पदवीदान समारंभात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ ने अॅड. भावेश यांचा सन्मान
आविष्कार २०१९ मध्ये अॅड. भावेश यांनी केले होते राज्यस्तरावर प्रेझेंटेशन
(अॅड. भावेश यांचा सन्मान करताना विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा व अन्य मान्यवर)
दिनांक:- १८/०९/२०२५ यवतमाळ
सध्या तंत्रज्ञानाचे युग असुन या युगात एआय ने पाऊल टाकले आहे. एआय मुळे तासाभराच्या काम देखील काही क्षणात पूर्ण होत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात आता एआय शिवाय पर्याय नाही, हिच बाब विचारात घेऊन स्थानिक यवतमाळ येथील विधीज्ञ अॅड. भावेश रवि श्रीराव यांनी आपले विधीचे शिक्षण पूर्ण केलेल्या स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ च्या विद्यार्थ्यांकरीता खास सॉफ्टवेयर तयार करुन नुकतेच ते महाविद्यालयाला हस्तांतरीत केले होते. त्यामुळे दिनांक १७ रोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पदवीदान समारंभात अॅड. भावेश रवि श्रीराव यांचा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांडवलकर, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ चे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी सन्मान केला.
अॅड. भावेश श्रीराव हे व्यवसायाने जरी विधीज्ञ असले तरी त्यांना संगणक व तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्यांनी आपल्या तांत्रिक शिक्षणाचा वापर करुन आपल्याच महाविद्यालयाकरीता सॉफ्टवेयर तयार करुन दिले. या सॉफ्टवेयर मुळे आता विधी क्षेत्रातील विद्यार्थी हे वेगवेगळ्या विषयांची अद्ययावत माहिती घेऊ शकणार असुन या सॉफ्टवेयर मध्ये तयार केलेल्या विविध मनोरंजक खेळातून झालेल्या अभ्यासाची उजळणी देखील करता येणार आहे. या सॉफ्टवेयरवर महाविद्यालयीन प्राध्यापकांचा महत्वाची भुमिका राहणार असुन त्यातून ते वैयक्तिक विद्यार्थ्याकडे व त्यानी केलेल्या अभ्यासाचे अवलोकन देखील करु शकणार आहे. महाविद्यलायाच्या असाईनमेंटस आजरोजीस अॅड. भावेश श्रीराव यांनी तयार केलेल्या ‘माईंड व्ह्यु’ याच अॅपवर घेतल्या जात आहे. यामुळे महाविद्यालयाला देखील मोठा फायदा झालेला आहे.
अॅड. भावेश श्रीराव यांनी या सॉफ्टवेयर बनविण्याची सुरुवात याच महाविद्यालयातून केली होती व त्यांनी हे अॅप संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘अविष्कार २०१९’ या युवा महोत्सवात सादर केले असता, त्यांची निवड राज्यस्तरावर झाली होती. त्यांनी आपल्या अॅपचे प्रेझेंटेशन यवतमाळ, अमरावती व त्यानंतर मुंबई येथे राज्यस्तरावर केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर अॅड. भावेश यांनी या अॅपचा विचार मनातून न काढून टाकता, त्यावर अहोरात्र मेहनत घेऊन ते पूर्ण करुन आपल्या महाविद्यालयाला सोपविले. त्याबद्दल महाविद्यालयाने नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात त्याचा यथोचित सन्मान केला होता. यावेळी मान्यवरांसह स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ चे प्रा. स्वप्नील सगणे, प्रा. वैशाली फाळे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, अॅड. शंतनु कनाके, अॅड. रंजित अगमे आदी उपस्थित होते.
(अॅड. भावेश रवि श्रीराव)
यवतमाळ
मो. ७०३८४९४४६४