• सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरील हा ‘गंभीर आघात’ असल्याची भावना.

यवतमाळ: सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा विवेक विचार मंच, यवतमाळने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी, असंविधानिक व निंदनीय असल्याची भूमिका मंचाने घेतली आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्लाया घटनेला केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला न मानता, भारतीय न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात मानला गेला आहे. भारतीय लोकशाहीत मतभेद व्यक्त करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना, अशा प्रकारे हल्ला करणे हे असंविधानिक, असभ्य व अवमानकारक कृत्य आहे.

विवेक विचार मंचने म्हटले आहे की, सुबुद्ध भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करत आहेत.

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचाही निषेध

या घटनेच्या माध्यमातून काही समाजद्रोही, फुटीरतावादी तसेच राजकीय शक्ती समाजात द्वेष व जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, याचाही विवेक विचार मंचने निषेध केला आहे.

मंचाच्या मते, हा प्रकार कोणत्याही धर्माशी किंवा समाजाशी संबंधित नसून, तो विकृत व असंविधानिक मानसिकतेचा परिणाम आहे. न्याय संस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे.

हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी

विवेक विचार मंच, महाराष्ट्राच्या वतीने या घृणास्पद व असंविधानिक कृत्याचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. मंचाने या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरन्यायाधीश यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले नसले तरी, सरकारने स्वतःहून तक्रार/गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस व बळकट सुरक्षा व्यवस्था व आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली आहे.

या निषेधात विवेक विचार मंच यवतमाळ तर्फे जिल्हा संयोजक संग्राम कळणे, ज्ञानेश्वर खंडाळे, दिलीपराव तेलंग, सागर कळणे, नवनीत महाजन, नयन मांडवे, कुशल कोठेकर, कंदन वाघ, संदिप चांदवे, प्रकाश कळणे, देवेंद्र वानखडे, प्रशांत माळवे, आकाश हातागळे, उज्वल ढोबळे, सुरेश कळणे, वासुदेव तेलंगे, अरुण सनेसर, रुषाली कळणे, गौतमजी कुंभारे, प्रवीण पांडे, प्रवीण राऊत, घनशाम हटकर, गेडाम सर आदी सहभागी झाले होते

(एनटीव्ही न्यूज मराठी, यवतमाळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *