आरोपींकडून एकूण ११,१७,७४०/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
पोलीस स्टेशन रिसोड, जि.वाशिम येथे दिनांक ०१/०३/२०२५ रोजी फिर्यादी राजेश श्रावण बलकार, रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशिम यांचे जबानी रिपोर्टवरून अप. क्र. १०४/२०२५ कलम ३०५ (ए), ३३१ (४) बीएनएस. अन्वये दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी १) ईश्वर उर्फ प्रभूराज युवराज पवार, रा.बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा व २) शामराव रामकिसन पवार, रा. जांभरूण नावजी, ता.जि.वाशिम यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर मा.पोलीस अधीक्षक साहेब, वाशिम यांचे आदेशाने नमूद आरोपींना पोलीस स्टेशन रिसोड यांचे ताब्यात देवून गुन्हयांचे गांभीर्य बघून संयुक्त कार्यवाहीचे आदेश दिल्याने पोलीस स्टेशन रिसोड व स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त तपास करून आरोपी नामे १) ईश्वर उर्फ प्रभूराज युवराज पवार, वय २५ वर्षे, रा. रा.बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा २) शामराव रामकिसन पवार, वय ३५ वर्षे, रा. जांभरूण नावजी, ता. जि. वाशिम यांचा पीसीआर घेवून सखोल विचारपूस करून आधूनिक व तांत्रिक पध्दतीने तपास केला असता आरोपींनी एकूण १० गुन्हयांची कबूली दिली व नमूद आरोपी यांचेकडून एकूण ११२ ग्रॅम (११.२ तोळे) सोने व ५०० ग्रॅम (५० तोळे) चांदी, एक मोबाईल, एक मोटारसायकल व नगदी ४५००/- रू. असा एकूण किंमत ११,१७,७४०/– रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला. या आरोपींची टोळी असून आणखी बुलडाणा व हिंगोली जिल्हयातील ०३ आरोपी सहभागी आहेत. हि टोळी महाराष्ट्रात व इतर राज्याबाहेर सुध्दा सक्रिय असल्याने सामान्य जनता यांचे घरफोडी सारख्या कृत्यामूळे भयभीत झाली होती. उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आले आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड, मा. सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम नवदिप अग्रवाल (IPS), उपविभाग वाशिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मसकर, मसपोउपनि मिना पाथरकर, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू, दिपक सोनोने, गजानन झगरे, पोलीस अंमलदार विनोद घनवट, रवि अढागळे, परमेश्वर भोणे, देविदास काळबांडे, संदीप दुतोंडे, दिपक घुगे, गजानन गोटे, सुरज खडके, चापोहवा. साहेबराव मुकाडे, मपोशि/ योगिता भस्मे, कांचन डोंगरदिवे, तसेच स्थानिक गुन्हे शाखाव रिसोड पोलीसांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *