नांदखेडा येथील शाळेच्या क्रिडांगणासाठी चोरीचा मुरुम वापरुन शासनाला चुना लावत असल्याची तक्रार
वनविभागातुन चोरलेला मुरुम गेला कुठे?
सखोल चौकशीची मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-क्रिडांगण वार्षिक अनुदान योजना २०२४-२५ व्दारे जिल्हा वार्षीक क्रिडांगणावर विविध खेळाची मैदाने तयार करण्याच्या योजनेतुन मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा येथील जि.प.शाळेत सुरु असलेल्या पटांगणाच्या कामाकरीता चोरीचे गौणखनिज वापल्याच्या तक्रारीनंतर महसुल विभाग आणी वनविभागाकडुन स्पाॅट चौकशी करण्यात आली आहे.महसुल विभागाच्या चौकशीनुसार सदर मुरुम हा दि.६,७ आणी ८ रोजी खानापुर येथुन राॅयल्टी भरुन टाकलेला आहे.पण प्रत्यक्षदर्शी राॅयल्टीची वेळ आणी तक्रारकर्त्याकडे असलेले जिओ टॅगचे फोटो यात तफावत दिसुन येत आहे तर दुसरीकडे जर खानापुर येथुन शाळेच्या कामासाठी मुरुम आणला तर मग वनविभागातल्या हद्दीतुन चोरी गेलेला मुरुम कुणी नेला याचा शोध सुरु असुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचे कळले.
मौजा नांदखेडा ता.मंगरुळपीर येथील जि. प. प्राथमिक शाळा नविन इमारत च्या प्रांगणात (आवारामध्ये) गौण खनिज सदृश्य रॉ मटेरियल व तसेच गौण खनिज (मुरुम)
आढळुन आल्याच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली आहे.मौजा नांदखेडा येथील जि. प्र. प्राथ शाळा नविन इमारतच्या आवारामध्ये असलेल्या गौण खनिज सदृश्य रॉ मटेरियलची तसेच गौण खनिज ची दिनांक- : ३०/०५/२०२५ रोजी मोक्यावर जाऊन मौका पाहणी केली असता नविन शाळेच्या आवारामध्ये गौण खनिज सदृश्य रॉ मटेरियल अदांजे १० ते १५ ब्रास वा तसेच इतर गौण खनिज प्रकार मुख्य अंदाजे ३५ ते ४० ब्रास मटेरियल अंदाजे आढळुन व दिसुन येत आहे या बाबत गावात स्थानिक चौकशी केली असता रॉ मटेरिअस बाबत मागिल काही दिवसा अगोदर आदेशाने नांदखेडा ग्रामपंचायत ने गावातील रोडवरील अतिक्रमण काढले व अविक्रमण मध्ये निघालेले रॉ मटेरिअल असल्याचे सांगण्यात आले व तसेच गौन खनिज (मुरुम) या बाबत स्थानिक चौकशी केली असता ग्राम विकास अधिकारी याच्या कडुन क्रिडागण विकास अनुदान योजना सन् २०२४- २५ जिल्हा वार्षिक क्रिडांगणावर विविध खेळाची मैदाने तयार करणे अशा आशयाचे जिल्हा क्रिडा अधिकारी वाशिम पञ सादर केले व या कामानुसार प्रस्तावित असलेले काम संबधित ठेकेदार यांनी सदर प्रस्तापित कामा करिता गौण खनिज वापरले असे चौकशी अंती कळले असल्याचा अहवाल तहसिल कार्यालयाला सादर केल्याचे कळले.सबंधीत ठेकेदाराने सदर मुरुम हा खानापुर येथील खानीतुन नियमानुसार राॅयल्टी भरुन आणल्याचे दि.११ आॅगष्ट रोजीच्या महसुल विभागाच्या चौकशी अहवालात नमुद आहे.मिळालेल्या माहीतीनुसार दाखवलेल्या राॅयल्टीमध्ये दि.६,७ आणी ८ आॅगष्ट रोजीच्या राॅयल्ट्या आहेत.दि.६ आॅगष्टच्या राॅयल्टीमध्ये १० वाजुन ४८ मिनिटाचा राॅयल्टी सुरु झाल्याचा वेळ नमुद आहे तर तक्रारकर्त्यांनी सादर केलेल्या जिओ टॅगींगच्या फोटोमध्ये दि.६ रोजी सकाळी ९ वाजुन १९ मिनिटाचा कालावधी आहे की त्यावेळी सदर ठिकाणी मुरुम टाकला.याचा अर्थ मुरुम हा आधिच टाकल्या गेलेला होता हे अधोरेखीत होते.आणी ठेकेदार आणी भ्रष्ट कर्मचार्यांना वाचवण्यासाठी राॅयल्टीचा बनाव केल्या जात असल्याचा अरोप होत आहे.

वनभिगातुन अवैधपणे ऊत्खनन केलेला मुरुम गेला कुठे?
वनवाभागातुन अवैधपणे चोरुन नेलेल्या मुरीमाचा शोध सुरु केला आहे.सदर ठिकाणावरुन अवैध मुरुम ऊत्खनन झाले हे माञ निश्चीत असल्याचे पुरावे आढळत आहेत.असे असतांना नांदखेडा शाळा परिसरातील सुरु असलेल्या कामावर टाकलेला मुरुम हा चोरीचा असल्याच्या तक्रारीवरून तो मुरुम वनभिवागाच्या हद्दीतुन तर अवैधपणे आणल्या गेलेला नाही ना?याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाने स्पाॅट पाहणी करुन दोन्ही ठिकाणचे मुरुमाचे नमुने तपासणे आवश्यक बनले आहे.
मुरुम वाहतुक करणार्या वाहणांची चौकशी आवश्यक
नांदखेडा शाळा परिसरातील कामावर टाकलेला मुरुम हा कारंजा तालुक्यातील खानापुर येथुन दि.६,७ आणी ८ आॅगष्ट रोजी ऊचल केल्याचे आणि तशा वेळेनुसारच्या राॅयल्ट्याही चौकशीदरम्यान सादर केल्या आहेत.सदर वाहतुकीचे वाहन कोणत्या मार्गे आणल्या गेले आणि नमुद वेळेची पाहणीसाठी त्या मार्गावरील असलेल्या सिसिटिव्ही कॅमेराची पाहणी करावी म्हणजे सत्य ऊजेडात येइल अशी मागणी आता होत आहे.
वनविभागाच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष
गौनखनिजाच्या तक्रारीची त्वरीत दखल घेवुन वनविभागाच्या वतीने स्पाॅट पाहणी करण्यात आली आहे.वनविभागाच्या हद्दीतुन चोरी गेलेला मुरुम हा नांदखेडा शाळा परिसरातील कामावर टाकलेला आहे का? याची आता चौकशी होणार आहे.या चौकशीवरुन आता सबंधित ठेकेदारावर की ग्रामपंचायतीवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्याय न मिळाल्यास आमरण ऊपोषण
शाळेच्या कामावर अवैधपणे मुरुम टाकुन बिले ऊकळुन शासनाला चुना लावण्याचा प्रकार सुरु असुन सदर प्रकरणी सखोल चौकशी व्हावी तसे न झाल्यास आणि न्याय न मिळाल्यास आमरण ऊपोषणही कायदेशीर मार्गाने करण्याचा इशारा तक्रारकर्त्याकडुन देण्यात आला आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206