♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट

श्री क्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चोंडीच्या सीना नदीवर २ बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने २१ लाख रूपये मंजुर केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सिंचन, पाणीपुरवठा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे, असे विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चोंडी (ता. जामखेड) येथे ६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या ‘श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यास’ सरकारने मंजुरी दिली होती. या आराखड्यासाठी ६८१ कोटी ३२ लाख रूपये खर्चाला मान्यता देत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

N Tv News Marathi🎥📷 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896