बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून मोरगावला नावलौकिक आहे. येथे रयत संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामदैवत यात्रेचा करमणूक कार्यक्रम झाला. हा जुना व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारित करून चर्चा सुरू आहे. नको त्या विषयांवर मीडियाने मनसोक्त चर्चा केली. यादरम्यान नाहक संस्थेची व गावाची अब्रू गेली. याचा खरा फायदा कोणाला ? हे अजूनही समजले नाही. परंतु या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक व नामांकित प्रिंट मीडियातून दाखवलेल्या बातम्या व झालेली चर्चा हा या माध्यमाचा उतावळेपणा…. असल्याचं मत समाजातील जाणत्या लोकांनी व्यक्त केले.


सध्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक बेरोजगार तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून नको ते विषयावर टीका टिपणी करून वेळ व्यर्थ घालवत आहे. सोशल मीडियाचा सध्या अनेकांवर प्रभाव आहे. बारामतीचे मोरगाव येथे ग्रामदैवत यात्रेच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. यातून मीडियात झालेली चर्चा हा वृत्तांकनाचा प्रमुख भाग आहे. रयत शिक्षण संस्था आणि मोरगाव या दोन ठिकाणांना नाहक टार्गेट करून बदनाम करण्यात आले.


सध्या मीडियातील अति उत्साही कर्तुत्व तसेच उतावळेपणामुळे इलेक्ट्रॉनिक व काही प्रमाणात प्रिंट मीडियाची विश्वासार्हता ढासळत चालली आहे. कोण नृत्यिका कशी आणि कुठे नाचली शाळेच्याच ग्राउंड वर कशाला राज्यात काय ? परिणाम होईल समाजातील जाणकारांना काय ? वाटते. हे सर्व भंपक प्रश्न चर्चेला घेऊन मीडियाने काय साध्य केलं हे समजलं नाही.
बारामती तालुका हा राजकीय दृष्ट्या देशातील एक अग्रगण्य म्हणून समजला जातो. त्या अर्थाने त्या भगत नेतृत्व करणाऱ्या कुटुंबातील राजकारण्यांचा या समाज व्यवस्थेतील व्यवस्थापनावर प्रभुत्व अधिकार असणे स्वाभाविक आहे. त्या ठिकाणी कोणीही असो त्यांनी त्या संस्थे प्रति केलेला त्याग केलेले कार्य हे असाधारण आहे. म्हणूनच ते त्या पात्रतेपर्यंत त्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. याविषयी दुर्दैवाने समाज माध्यमात अपेक्षित प्रभावी चर्चा होत नाही. परंतु ते चुकले कसे हे जास्त सांगितले जाते.
माध्यमांचा उतावळेपणा वेळेत आवर घालण आवश्यक आहे. या पुढील काळात याच माध्यमांचा सकारात्मक परिणाम होऊन बदल होण्याऐवजी याकडे करमणूक म्हणून पाहिलं जाईल हे मात्र; नक्की.

प्रतिनिधी- मनोहर तावरे बारामती

You missed