कान्हुर पठार (प्रतिनिधी):

“रक्तदान हेच महादान” या उदात्त भावनेला मूर्त रूप देत सामाजिक कार्यकर्ते प्रवीणभाऊ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २१/०८/२०२५ रोजी कान्हुर पठार येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हा उपक्रम पार पडणार आहे.

या सामाजिक उपक्रमांत रक्तदान शिबिराबरोबरच वृक्षारोपण, रुग्णांना फळांचे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यांचा समावेश असून, प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून आरोग्य, शिक्षण व पर्यावरण यांसारख्या संवेदनशील विषयांवर लोकजागृती साधण्याचा प्रयत्न होणार आहे.

संघर्ष फाउंडेशन हे पारनेर तालुक्यातील जनतेसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे, सामाजिक जाणिवा दृढ करणारे व्यासपीठ ठरले आहे. रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, मदतकार्य, पर्यावरण संवर्धन यांसारखे उपक्रम हाती घेऊन संस्थेने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. प्रवीणभाऊ दळवी यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा हा आगळावेगळा पद्धतीचा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

प्रवीणभाऊ दळवी मित्र परिवाराने या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करताना सांगितले की, “एका थेंबातून अनेक जीव वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हेच खरे महादान असून प्रत्येकाने त्यात आपले योगदान द्यावे.”

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *