• योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्टपर्यंत.


अहिल्यानगर: इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी दिली.

बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये तसेच एम.ए., एम.एस्सी. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १७ ते २७ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी केली जाईल आणि गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी ३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर होईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १२ सप्टेंबर २०२५ असेल. रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची दुसरी निवड यादी १५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यांच्यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

(एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *