♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट

गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या दर्ग्यावरून मतभेद होता. आज पहाटे काही समाजकंटकांनी दर्ग्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार आज पहाटेपासूनच या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटक असे प्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे.