
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने हा भव्य सोहळा पार पडला.
या प्रसंगी आमदार सुनील कांबळे यांच्यावतीने युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. “समाजातील प्रत्येक युवकाने शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या समाजावर होत असलेले अन्याय धुडकावून लावण्यासाठी शिक्षण आणि एकजूट हीच खरी ताकद आहे,” असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास आधुनिक लहुजी शक्ती सेना नगीना कांबळे, लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे, पोलीस निरीक्षक कांगणे साहेब यांच्यासह समाजातील अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष रामजी गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कचरू भाऊ सगट यांनी केले.
या भव्य जयंती सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी हजारो मातंग समाजाचे युवक उपस्थित होते.
