जालना : जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते जे.बी.के. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी.बोरकर हे होते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.के.सर्जे हिंदी विभाग प्रमुख प्रा.अनिल वैद्य डॉ.एस.डी.पाटील प्रा.वाघमारे एस.पी.यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुदाम पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते मा.एस.बी.बोरकर सर यांनी हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले व हिंदी भाषा आज देशासाठी किती महत्त्वाची आहे याविषयी आपले अनमोल विचार प्रकट केले व हिंदी भाषा आज वैश्विक स्तरावर देखील आपले महत्त्व सिद्ध करीत आहे असे मत व्यक्त केले तसेच याप्रसंगी प्रा. अमरसिंग धवलिया यांनी हिंदी दिवसाच्या प्रसंगी आपली कविता सादर केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी हिंदी भाषेविषयी महत्व सांगितले तसेच हिंदी भाषा आज संपूर्ण देशात बोलली जाते याविषयी अनेक दाखले देऊन हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव देवरे यांनी केले तसेच आभार आम्रपाली हिवाळे या विद्यार्थिनीने मानले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना.