जालना : जाफराबाद शहरातील ग्रामोन्नती इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती दिन तिरंगा फडकवत साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भिसे मॅडम त्यांनी प्रतिमा व ध्वज पूजन करून ध्वजरोहन केले यावेळी विध्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते वर्ग नर्सरी ते 4 थी पर्यंतच्या विध्यार्थ्यानी भाषण गीत गायन करून उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पैठणे मॅडम यांनी केले उपमुख्यध्यापक दमूता गाडेकर सरांनी मनोगतातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी विदर्थ्यांना माहिती दिली तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापिका श्रीमती.रत्ना भिसे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातून निजाम राजवट तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्याची नवी पहाट उगविण्यासाठी शहीद झालेल्या, आपल सर्वस्व पणाला लावून प्राणाची आहुती देऊन हुतात्मा झालेल्या शूरवीराविषयी त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या उवस्थिताना शुभेच्छा दिल्या. शेवटी उपस्थीताचे राऊत मॅडम यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका भिसे मॅडम, उपमुख्याध्यापक दमूता गाडेकर सर तसेच शिक्षक कर्मचारी तसेच शाळेच्या मदतनीस मावशी यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना
