जालना : जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग , जाफराबाद आणि ग्रामीण रुग्णालय, जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. हे
शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र. तु. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर एस पाटील उपस्थित होते.
या शिबिरात स्त्रीरोग, रक्तदाब, सिकल सेल ॲनिमिया, हिमोग्लोबिन, उंची- वजन, डोळे व दात तपासणी आदी आरोग्य तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांनी तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन दिले.
विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेले हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी जगतवाड प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ, व प्रा. डॉ. शरद मोहरीर, प्रा. डॉ. राहुल मोरे प्रा. अनिल वैद्य, प्रा. श्रीमती सरिता मनियार प्रा. श्रीमती मनीषा मोहिते यांचे सहकार्य लाभले
प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना