जालना : जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब विभागास शैक्षणिक वर्ष 2024- 25 करिता युनिसेफ व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी तंत्रज्ञान विद्यापीठ शिवाजीनगर ,पुणे येथे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण संचालक माननीय शैलेंद्रजी देवळाणकर ,तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे चे कुलगुरू डॉ. बिरोटे व युनिसेफ चे अधिकारी डॉ.मुस्तजीर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब विभागास एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले.यात जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब फॅकल्टी कॉर्डिनेटर पुरस्कार प्राध्यापक मनीष बनकर, ग्रीन क्लब समन्वयक यांना देण्यात आला. जिल्हास्तरीय उत्कृष्ट पाणी बचतीचा शॉर्ट व्हिडिओ चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ग्रीन क्लब विभागास प्राप्त झाला. तसेच पाणी बचतीचे महत्त्व असलेल्या पोस्टरला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक कु. मेहेक इराम बी.एससी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीला देण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 -25 करिता पर्यावरण, पाणी बचतीचे महत्व व प्रदूषण या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि समाज यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यात आले होते.या कार्याची दखल राज्य शासन व युनिसेफ यांनी घेतली.त्या कारणास्तव सिद्धार्थ महाविद्यालयास हे पुरस्कार देण्यात आले. हे सर्व पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ .शैलेंद्रजी देवळांकर ,युनिसेफचे अधिकारी डॉ. मुस्तजीर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख व ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक मनीष बनकर यांनी स्वीकारले. या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दादासाहेब म्हस्के व संस्थेचे सचिव प्रा.डॉ. राहुल म्हस्के यांनी ग्रीन क्लब विभागाचे व महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *