• राणा दादा आणि सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पा धरणे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक!

नळदुर्ग (प्रतिनिधी):

तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या नळदुर्ग नगरपरिषदेच्या राजकारणात आता नवीन घडामोडी वेग घेत आहेत.
गेल्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे बसवराज ‘आप्पा’ धरणे यांचं नाव यंदाच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे.

निवडून येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले आप्पा धरणे यांनी विकासासाठी ठोस भूमिका घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आमदार राणा जगदीशसिंह पाटील आणि पक्षनेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहरातील अनेक महत्त्वाची कामं पूर्ण केली.

नळदुर्ग तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी तसेच तीर्थक्षेत्र असलेल्या खंडोबा मंदिर, नानी मा दर्गा, राम मंदिर अशा धार्मिक स्थळांच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शहरातील ऐतिहासिक किल्ल्याला पर्यटन दर्जा मिळावा, यासाठीही त्यांनी विशेष पाठपुरावा केला.

कोरोना काळात त्यांनी गावातील आणि बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची सोय केली, तसेच गरजवंत नागरिकांना किराणा किटचे वाटप केले.
याशिवाय त्यांनी अनेक वेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली, समाजोपयोगी कार्यक्रम राबवले, तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली.
गरजू कुटुंबांना विवाहसोहळ्यात मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

या सर्व समाजकारणामुळे आप्पा धरणे हे जनतेच्या मनात सेवाभावी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
दूरदृष्टी असलेले, अभ्यासू आणि कार्यसम्राट युवक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

भाजपच्या माध्यमातून शहरातील अनेक विकासकामांना गती मिळाली असून, अनेक नागरिकांच्या समस्या त्यांनी आमदार राणा जगदीशसिंह पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या सहकार्याने सोडवल्या आहेत.

सध्या बसवराज आप्पा धरणे हे भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला प्राधान्य मिळत असल्याची चर्चा असून,
गावकरी, स्थानिक राजकीय नेते तसेच मित्रपक्षांचे कार्यकर्ते — सर्वांच्याच मतानुसार
“आप्पा धरणे हे अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तिमत्व आहेत” असा सूर उमटत आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून जर आप्पा धरणे यांना उमेदवारी मिळाली,
तर ही संधी सोन्यात मोलाची ठरेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, त्यांच्या नावावरून विरोधकांनी कोणतेही नवीन नाव जाहीर केलेले नसल्याने
नळदुर्गच्या राजकारणात आप्पा धरणे यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट होत आहे.


✍️ — प्रतिनिधी : आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर – नळदुर्ग
📞 मो. 9975177475

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *