जालना: जाफ्राबाद येथे दि. 11 ऑक्टोंबर, 2025 रोजी वाणिज्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे अंतर्गत जिल्हा सहकारी बोर्ड म. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025” निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
‘सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास’ विषयक वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.शाम सर्जे यांनी सहकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी जालना जिल्हा सहकारी बोर्ड म. जालना येथे जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री.एस.आर.पवार यांनी विद्यार्थ्यांना सहकार विषयक माहिती दिली तसेच स्पर्धकांना स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.मोहन बिरादार स्थानापन्न होते.
वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री.अमोल भगवानराव वाकळे, प्रमाणित लेखापरीक्षक, सहकारी संस्था जालना, श्री.प्रल्हाद सुखदेव वराडे, प्रमाणित लेखापरीक्षक, सहकारी संस्था जालना आणि सिद्धार्थ महाविद्यालयातील सहकार विषय तज्ञ प्रा.रवींद्र चौधरी लाभले होते.
सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून जिल्हा स्तरावरून विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रु.१००० व ट्रॉफी कु.शुभम अण्णा फालके या विद्यार्थ्याने मिळविला असून हा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर द्वितीय बक्षीस रु.५०० व ट्रॉफी कु.आदित्य पंडित साळवे या विद्यार्थ्याने संपादित केले.
वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील प्रा.श्रीमती.सरिता मणियार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मनोज पगारे व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.