- शेतकऱ्यांना तातडीने मदत करा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.

जालना: जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी, दि. ०८ रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेता, सरकारने सरसकट कर्जमुक्ती करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जाफराबादचे तहसीलदार यांना या मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या कोपामुळे हिरावला गेला आहे.
- ढगसदृष्य पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे नदीकाठावरील लहान-मोठे तलाव १००% भरले आहेत.
- तलाव पूर्ण भरून त्यांचे पाणी संपादित केलेल्या जमिनीच्या बाहेर शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.
- यामुळे तलावाजवळच्या शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला असून, या नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने निवेदनातील मागण्या मान्य करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.
आंदोलनात प्रमुख उपस्थिती
या धरणे आंदोलनात शिवसेनेचे (उ बा ठा) अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, तालुका प्रमुख कुंडलिक पा. मुठ्ठे, युवा उपजिल्हाधिकारी मंगेश गव्हाड, जेष्ठ शिवसैनिक हरीचंद्र म्हस्के, विष्णू लोखंडे, भागवत घोडके, इरफान नेता, दिनकर मिसाळ, अशपाक कुरेशी, समीर शहा, राजेंद्र वानखेडे, देवीसिंग बायस, समाधान सवडे, संतोष वायाळ, गणेश वायाळ, गजानन मुळे, विनोद शेळके, राज देशमुख, गोविंदा माकोडे, अमोल नरवडे, गणेश जंजाळ, अमोल जंजाळ, एकनाथ परिहार, सुभाष परीहार, अरुण काकडे, सुभाष परीहर, गजानन कदम, शेख सलमान, नंदू गायकवाड, लक्ष्मण काळे, अमोल पंडित, यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.