नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
त्यांच्या निधनामुळे राहुरी, नगर आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आ.कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता.
बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी 1995 मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता.
नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वरचष्मा होता.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले. शेतकरी, सर्वसामान्य वर्ग आणि युवकांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात स्वतंत्र ओळख आणि ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी कर्डीले होते. नगर, राहुरी भागांत त्यांच्या निधनामुळे भावनिक शोक व्यक्त होत आहे.राजकारणात जमिनीवर राहून काम करणारा, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून शिवाजी कर्डीले यांचे नाव सदैव स्मरणात राहील
https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-4376290373566816&output=html&h=390&adk=643785530&adf=3633650985&pi=t.aa~a.3767545918~rp.1&daaos=1760608920411&w=390&lmt=1760673255&rafmt=1&to=qs&pwprc=3519532204&format=390×390&url=https%3A%2F%2Fahilyanagarlive24.news%2Flocal%2Frahuri-mla-shivaji-kardile-passes-away-due-to-heart-attack%2F&fwr=1&pra=3&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&fa=40&abgtt=6&dt=1760673255912&bpp=3&bdt=2932&idt=3&shv=r20251016&mjsv=m202510140101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D9165227278503f9e%3AT%3D1760673255%3ART%3D1760673255%3AS%3DALNI_MY90Wn8LHniIssjWSRLd3QJIoue8Q&gpic=UID%3D000011a5171bc1ae%3AT%3D1760673255%3ART%3D1760673255%3AS%3DALNI_MbB2i2TOBOJ8fy_bR4y25Q9mmvfoA&eo_id_str=ID%3Dca5aea4a1afb72f0%3AT%3D1760673255%3ART%3D1760673255%3AS%3DAA-AfjaHysKvpEUOhjYOYBLxQGKc&prev_fmts=0x0%2C390x390%2C390x390%2C390x390%2C390x390%2C390x390&nras=4&correlator=8789769943026&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=1&u_h=844&u_w=390&u_ah=844&u_aw=390&u_cd=24&u_sd=3&adx=0&ady=3270&biw=390&bih=699&scr_x=0&scr_y=401&eid=95373554%2C31095077%2C31095218%2C95373013%2C95373974%2C95374047%2C95374289&oid=2&psts=AOrYGsmqxhY5cwkwEYQwCzXEl6bruJ4WSKwGUb0goZLEAeBc3xY-H_RbNQTcEuQ4X4Nci83NeyQvvZ773WQ3erh3475kgTgzNyUoMuU&pvsid=6784273499019209&tmod=984989084&uas=0&nvt=1&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C390%2C0%2C390%2C739%2C390%2C739&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=1152&bc=31&bz=1&pgls=CAEQBBoHMS4xNjMuMA..&ifi=7&uci=a!7&btvi=5&fsb=1&dtd=21
