- ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, ही समस्या तीव्र.
- अकोल्यातील तरुणाने थेट शरद पवारांना केली भावनिक विनंती.
- शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान पत्ता आणि मोबाईल नंबरसह दिले पत्र.
- पत्रातील नम्र विनंतीने पवारांसह उपस्थित नेते झाले स्तब्ध.
ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, ही गंभीर सामाजिक समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच समस्येने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच ‘माझं लग्न लावून द्या’ अशी भावनिक विनंती केली आहे.
अकोल्यात झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान या तरुणाने स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबरसह पत्र देत पवारांना साकडे घातले. या पत्रात ‘माझं वय वाढतंय, कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहून संसार नीट चालवेन,’ अशी नम्र विनंती त्याने केली आहे. या भावनिक पत्राने पवारांसह उपस्थित नेते अनिल देशमुख आणि जयंत पाटील हेही काही काळ स्तब्ध झाले. ग्रामीण तरुणांच्या वेदना आणि सामाजिक वास्तव मांडणारं हे पत्र आता चर्चेचा विषय ठरत आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, अकोला
