बाळापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे सुपुञ नितीन गव्हाणकर यांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचा उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला
अकोला : बाळापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे सुपुञ बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन गव्हाणकर यांचा मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.यावेळी प्रवेश करते वेळी आमदार डाँ मनीषा कायंदे माजी आमदार बळीराम सिरस्कार बाळापुर विधानसभा प्रमुख उत्तम डुकरे उपस्थीत होते.गव्हाणकर यांच्या प्रवेशाने आता बाळापुर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांचा चांगलाच फायदा होईल.
-अमोल जामोदे