अँकरः पविञ श्रावण मासारंभचा पहिला श्रावण सोमवारला उद्या पासुन प्रारंभ होणार असुन शहरांतील साफसफाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन शिवभक्त व शांतता समिति सदस्याचा वतीने देण्यात आले होते.प्रशासन जागे होऊन रोडवरील साफसफाईला सुरुवात करण्यात आली.
व्हाँईसः बाळापूर शहरात श्रावण सोमवार निमित्य प्रत्येक श्रावण सोमवारी कावड महोत्सव साजरा होतो.तसेच शहरांत कावड मार्गावर साफसफाई करण्यात यावी तसेच खड्डे बुजविण्यात यावे याबाबतचे निवेदन कावडधारी शिवभक्त व शांतता समितीसदस्यांचा वतीने बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी नगर,परिषद,मुख्यधिकारी यांना देण्यात आले होते.अकोला जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये कावड पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.त्यामध्ये बाळापूर येथील शांतता समिती सदस्य उमेशआप्पा भुसारी यांनी बाळापूर शहरांतील कावड मार्गाची समस्या तेथे मांडली होती.याबाबीवर प्रशासन जागे होऊन बाळापूर शहरात साफसफाई व खड्डे बूजविण्यात प्रारंभ करण्यात आला आहे.