बाळापूरः भारतीय जनता पार्टी बाळापूर, शहरच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्य भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोञे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तसेच अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन सिध्देश्वर हनुमान मंदीर येथे माजी नगर परिषद उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षते खाली साजरी करण्यात आली.महिला आघाडी अध्यक्ष सौ.मानकर व महिला आघाडी सचिव नेहा शाह यांनी समाजामधील महिल्यांनी हस्तकला व विनकाम व झाडु टोपले बनविणाय्रा महिलांचा शहर भाजपचा वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला भाजपा जेष्ठ नेते शामराव शेलारमामा बाबुजी शर्मा बंडु यादगिरे महेंद्रसिंह ठाकुर शहरध्यक्ष शिवम कानकुब्ज उर्फ बंटी महाराज डाँ रुपेश शाह अजय पदमने प्रितेश गुजराथी दिनेश सोनोने योगेश ठाकुर चेंतन्य अंबाडे गोलु पठाण सुरेश गोलाईत अमोल अहीर नारायण भुरेवाले वैभव भारसाकळे वनिता गोखले सुनंदा भारसाकळे यांचासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते महीला आघाडी यावेळी उपस्थीत होते.