section and everything up until
* * @package Newsup */?> हेडलाईनः बाळापूर शहर भाजपाध्यक्षपदी बंटी महाराज. | Ntv News Marathi


बाळापूरः भारतीय जनता पार्टीचा बाळापूर शहरध्यक्षपदी शिवम कानकुब्ज उर्फ बंटी महाराज यांची अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी नियुक्ती पञाव्दारे केली.भारतीय जनता पक्षाच्या मुल्याधिष्ठित व विकासाभिमुख प्रणालीवरील त्यांचा स्नेह व विश्वास तसेच पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी या निमित्ताने पक्षाने त्यांच्यावर सोपविली.यावेळी बाळापूर शहरात भाजपामय वातावरण करणार असल्याचे मत तसेच शहरांतील तत्कालीन भाजपा कार्यकारणीमध्ये कोणत्याही फेर बदल करण्यात येणार नसल्याचे मत यावेळी नवनियुक्त शहरध्यक्ष बंटी,महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी नियुक्ती श्रेय भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोञे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *