
येडशी, धाराशिव:
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील युवा उद्योजक श्री. कुमेश पवार यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी येडशी येथील मतिमंद निवासी विद्यालय व मूकबधिर विद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाचा आनंद वाटला.

यावेळी कुमेश पवार यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे तसेच फळांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून, यामुळे या विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
हा स्तुत्य उपक्रम साजरा करताना यावेळी येडशी गावचे माजी सरपंच जयंत राजे भोसले, रुपेश तपसे, रफिक पटेल, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर तात्या शिंदे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल,
एनटीव्ही न्यूज मराठी, येडशी, धाराशिव.
