धाराशिव तालुक्यातील येडशी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येडशी येथील नालंदा बौद्ध विहार समाज मंदिरमध्ये सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाज बांधवांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
चंदनशिवे गुरुजी यांनी आजच्या दिनाबद्दल सूत्रसंचालन केले. यावेळी सूर्यकांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ शिंदे, दादा कांबळे, रुपये होवाळ, विशाल शिंदे, शशिकांत होवाळ, कुंदन गायकवाड, संतोष होवाळ, विक्की शिंदे, लखन शिंदे, आकाश सोनवणे, राहुल शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते.
रफिक पटेल, एनटीव्ही न्यूज मराठी, येडशी धाराशिव
