साहेबांचा आदेश पाळणार की केराची टोपली दाखवणार?याकडे सर्वांचे लक्ष
वाशिम : मंगरूळपीर तहसीलमध्ये मनमानी कारभार सुरु असुन बायोमॅट्रिक मशिन नसल्यामुळे वाटेल तेव्हा कार्यालयात येण्याचे प्रमाणही कर्मचार्यांचे वाढले होते,स्वच्छतेचाही सर्वञ बोजवारा होता.याविषयीचे वृत्त माध्यम प्रतिनीधी फुलचंद भगत यांनी प्रकाशीत करताच तात्काळ येथील ऊपविभागीय अधिकार्यांनी तहसिलदार, कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार श्री.रवि राठोड,एन टी तसेच कर्मचार्यांची सभा बोलावून तहसिलच्या बेताल कारभाराविषयी चर्चा करुन सर्वांना आवश्यक त्या सुचना देवून वेळेत कार्यालयात कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.याबरोबरच ‘सुंदर माझे कार्यालय’ अंतर्गत सर्व विभागप्रमुखांनी आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर करुन पारदर्शक प्रशासनप्रणाली ठेवण्याविषयीही चर्चा केली.

मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचा कारभार सध्या बेताल झाला आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे हव्या त्या वेळी कार्यालयात तोंड दाखवत असुन लेटलतिफशाही वाढली आहे.वरिष्ठांनी तात्काळ या कार्यालयात बायोमॅट्रिक मशिन बसवून या लेटलतिफशाहीला चाप लावावा अशी मागणी होत आहे.तालुक्याचे मूख्य कार्यालय म्हणून महसुल विभागाला म्हणजेच तहसिल कार्यालयाला महत्व आहे.तालुका मॅजिस्र्टेट कार्यालय आहे.वाॅरंट काढण्याचे तसेच काही प्रकरणात सजा सुनावण्याचाही तहसिलला अधिकार असल्याचे समजते.अशा या प्रमुख कार्यालयात सध्या बेताल परिस्थीती पाहावयास मिळत आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे अवेळी कार्यालयात हजेरी लावतात.कार्यालयात आले तरी कॅन्टिंग आणी इतरस्ञ बसतात त्यामुळे खेड्यापाड्यातुन आलेल्या लोकांची कामे वेळेत होत नसल्याने मोठा ञास सहन करावा लागत आहे.कार्यालयात त्वरीत बायोमॅट्रिक हजेरी मशिन लावावी अशी मागणी होत आहे.कार्यालयातिल विभागामध्ये स्वच्छतेचाही अभाव पाहायला मिळत आहे.वेळेत झाडपुस होतांना दिसत नसल्याने कार्यालयात कचरा घाण दिसते.स्वच्छतागृहही घाणीच्या विळख्यात दिसते.दोन दिवसापुर्वी निवडणुकीसंदर्भातील एक वरिष्ठ अधिकारी या कार्यालयात आले असता स्वच्छतागृहाची घाण अवस्था चव्हाट्यावर आल्याचे समजले.या गोष्टीची दखल घेवून येथील कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार श्री.राठोड यांनी या कर्मचार्यांची शाळा भरवून शिस्तीचे धडे दिले.सर्व विभाग स्वच्छ राहतील याची काळजी घेण्याच्या तसेच सर्वांनी शासकीय कामकाज पारदर्शक आणी अद्यावत करण्याच्या सुचनाही दिल्या.शासकिय कामासाठी येणार्या नागरीकांना योग्य वागणूक देवून नियमानुसार वेळेत काम करुन देन्याचे आदेशही दिलेत.यानंतर प्रशासकीय कामातली कुचराई कदापीही खपवून घेण्यात येणार नसल्याचेही सर्व कर्मचार्यांना सांगुन कार्यालयीन नेमुन दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहण्याचेही सुचित केले.या सुचनांचे अद्यापही पालन होत नसल्याचे दिसुन येत असुन अशा बेताल कर्मचार्यावर प्रशासकिय कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.तसेच याविषयी वृत्तही प्रकाशित झाले होते.ऊपविभागिय अधिकारी यांनी तात्काळ याविषयी दखल घेवून तहसिलदार,नायब तहसिलदार,विभाग प्रमुखासह कर्मचार्यांची मिटिंग बोलावून कार्यालयात वेळेत हजर राहण्याच्या सुचना दिल्या.कार्यालयीन कामाव्यतिरिक्त आपला विभाग सोडुन इतरस्ञ न भटकण्याविषयीही ताकिद दिली.लवकरच मंगरूळपीर तहसिलला बायोमॅट्रिक मशिन येणार असल्याचेही सांगीतले.’सुंदर आपले कार्यालय’या ऊपक्रमाअंतर्गत कार्यालयाची नियमित स्वच्छता ठेवण्याविषयी पण सुचना दिल्या.लोकांची शासकिय कामे वेळेत आणी पारदर्शकपणे पार पाडण्याविषयीही सांगीतले.या सर्व सुचनांचे महसुल कर्मचारी कीती पालन करतील व लोकाभिमुख प्रशासन चालवतील की साहेबांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206