वाशिम : मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचा कारभार सध्या बेताल झाला आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे हव्या त्या वेळी कार्यालयात तोंड दाखवत असुन लेटलतिफशाही वाढली आहे.वरिष्ठांनी तात्काळ या कार्यालयात बायोमॅट्रिक मशिन बसवून या लेटलतिफशाहीला चाप लावावा अशी मागणी होत आहे.

तालुक्याचे मूख्य कार्यालय म्हणून महसुल विभागाला म्हणजेच तहसिल कार्यालयाला महत्व आहे.तालुका मॅजिस्र्टेट कार्यालय आहे.वाॅरंट काढण्याचे तसेच काही प्रकरणात सजा सुनावण्याचाही तहसिलला अधिकार असल्याचे समजते.अशा या प्रमुख कार्यालयात सध्या बेताल परिस्थीती पाहावयास मिळत आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे अवेळी कार्यालयात हजेरी लावतात.कार्यालयात आले तरी कॅन्टिंग आणी इतरस्ञ बसतात त्यामुळे खेड्यापाड्यातुन आलेल्या लोकांची कामे वेळेत होत नसल्याने मोठा ञास सहन करावा लागत आहे.कार्यालयात त्वरीत बायोमॅट्रिक हजेरी मशिन लावावी अशी मागणी होत आहे.कार्यालयातिल विभागामध्ये स्वच्छतेचाही अभाव पाहायला मिळत आहे.वेळेत झाडपुस होतांना दिसत नसल्याने कार्यालयात कचरा घाण दिसते.स्वच्छतागृहही घाणीच्या विळख्यात दिसते.दोन दिवसापुर्वी निवडणुकीसंदर्भातील एक वरिष्ठ अधिकारी या कार्यालयात आले असता स्वच्छतागृहाची घाण अवस्था चव्हाट्यावर आल्याचे समजते.या गोष्टीची दखल घेवून येथील कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार श्री.राठोड यांनी या कर्मचार्‍यांची शाळा भरवून शिस्तीचे धडे दिले.सर्व विभाग स्वच्छ राहतील याची काळजी घेण्याच्या तसेच सर्वांनी शासकीय कामकाज पारदर्शक आणी अद्यावत करण्याच्या सुचनाही दिल्या.शासकिय कामासाठी येणार्‍या नागरीकांना योग्य वागणूक देवून नियमानुसार वेळेत काम करुन देन्याचे आदेशही दिलेत.यानंतर प्रशासकीय कामातली कुचराई कदापीही खपवून घेण्यात येणार नसल्याचेही सर्व कर्मचार्‍यांना सांगुन कार्यालयीन नेमुन दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहण्याचेही सुचित केले.या सुचनांचे अद्यापही पालन होत नसल्याचे दिसुन येत असुन अशा बेताल कर्मचार्‍यावर प्रशासकिय कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *