कार्यक्रमाला नगरपालिका सहकार्य करेल—नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल
पालघर : जव्हार शहराला प्राचीन ऐतिहासिक,सांस्कृतिक , संस्थानकालिन वारसा परंपरेने लाभला आहे. त्यात मुकणे राजेशाही घराण्याची सत्ता जव्हारला होऊन गेली.त्यातील जव्हार संस्थानचे फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत यशवंतराव मार्तंडराव मुकणे राजांची १०४ वी जयंती ११डिसेंबर २०२१ ला येत असुन हि जयंती जव्हारवासियांकडून दिमाखात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी जव्हार नगर परिषद नगराध्यक्षांच्या दालनात जयंती विषयी आदिवासी बांधवांच्या नियोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.त्यात नगराध्यक्षांनी जयंतीच्या कार्यक्रमाविषयी हिरवा कंदिल दाखविला असुन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे सांगितले.

जव्हार नगरपालिका कार्यक्रमाला पुर्णपणे सहकार्य करेल,कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, अल्पोपहार,रांगोळी व सजावट तसेच सांस्कृतिक नृत्य याकरिता सहकार्य नगरपालिका करेल असे आश्वासन नगराध्यक्ष चंद्रकांतजी पटेल यांनी दिले.
यावेळी विजयराव मुकणे, संगीताताई भांगरे, संगीताताई जाधव, पञकार भरत गवारी, वैभव मुकणे, भवारी सर, सागर सातपुते,सचिन कोरडे व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.”जव्हार नगरपरिषदेला हि संस्थानकालिन वारसा आहे.याचा आम्हांला अभिमान आहे.राजे यशवंतराव मुकणे जयंती उत्सवास नगरपरिषद सहकार्य करेल”—-चंद्रकात पटेल,नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मो.नं.8408805860.