मोताळा पंचायत समितीअंतर्गत उऱ्हा येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले.

उऱ्हा येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी दोन शिक्षक देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एक शिक्षक नियमित येत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने पालक वर्ग आक्रमक झाला आहे.

या मागणीसाठी पालकांनी दोन ते तीन वेळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र, निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप पालकांनी केला.

त्यामुळे आज विद्यार्थी आणि पालकांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत शिक्षक देण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली.

यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *