• कवठ्यातील कोकणाची माता मंदिर चर्चेत
  • निसर्गरम्य टेकडीवर वसलेले मंदिर
  • भाविकांसह निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरले
  • अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी
  • मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
  • पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधींची अपेक्षा

GONDIA | गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरातील कवठा येथील कोकणाची माता मंदिर सध्या चर्चेत आले आहे. जंगलाच्या हिरवाईने वेढलेल्या उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर भाविकांसह निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

चारही बाजूंनी निसर्गसौंदर्याने नटलेल्या या मंदिर परिसरात पर्यटनाची मोठी क्षमता असतानाही अद्याप अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा का नाही, असा सवाल ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोकणाची माता मंदिर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा, आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि या ठिकाणाला अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास परिसरात पर्यटकांची संख्या वाढू शकते, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात आणि संक्रांत, कवठा गावांसह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते.

एनटीव्ही न्यूज मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *