- यावल आगाराला मिळाल्या 5 नव्या बसेस
- आमदार अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला यश
- भंगार बसेसमुळे प्रवाशांना येत होत्या अडचणी
- नव्या बसेसना राजमाता जिजाऊंचे नाव
- 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजता लोकार्पण
- यावलकर प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
JALGAON | यावलच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यावल एसटी आगाराला अखेर 5 नव्या जिजाऊ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचे उद्या, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून यावल एसटी आगारात गरजेपेक्षा अधिक नादुरुस्त आणि भंगार बसेस जमा झाल्याने प्रवाशांना अडचणी येत होत्या. मात्र प्रवाशांचा लालपरीवरील विश्वास कायम राहिला. तत्कालीन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन आणि नवनियुक्त व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने यावल आगार उत्पन्नात जिल्ह्यातील इतर आगारांच्या तुलनेत मागे राहिले नाही.
रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यावल आगाराला 5 नव्या बसेस मिळाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून, स्वराज्य संकल्पनेमागील राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ या नव्या बसेसचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे.
आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 5 बसेसचे लोकार्पण 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नव्या बसेसमुळे यावलकर प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
