यवतमाळ : दिग्रस शहरात अनेक नामवंताच्या मैफिली पार पडल्या त्यामध्ये वसंत देशपांडे ,उषाताई मंगेशकर ,अवधूत धोपटे, शिवशाही बाळासाहेब पुरंदरे, अजित कडकडे, सुरेखाताई पुणेकर, रमा मिरासदार अशा आभाळाच्या उंचीचि माणसे या शहरात भेटून गेली आहे या सर्वांचे कलाकृतीला दिग्रसकराणी दाद दिली आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या शहराने स्वतंत्र ठसा उमटविला आहे, या शहरात राज्य नाट्य स्पर्धेतील अनेक व्यावसायिक नाटके ही सातत्याने झाली आहे, ह्याच शहरात पुन्हा जिल्ह्यातील मोठे नाट्यगृह आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून उभे राहणे म्हणजे। दिग्रस शहरात पुन्हा नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ बहरेल असे गौरौद्ववर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज दिनांक 25 डिसेंबर रोजी दिग्रस येथे भूमिपूजन समारंभाप्रसंगी काढले.

यावेळी हास्य कलाकार अरुण कदम,समीर चौगुले,आमदार संजय राठोड यांचे प्रामुख्याने उपस्थितीत शिवसेनाप्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहाचे व डॉ,ए, पी,जे,अब्दुल कलाम व्यापारी संकुलाचे भूमिपूजन पार पडले, या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी जि प अध्यक्ष कालींदा ताई यशवंत पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रराग पिंगळे,नगराध्यक्षा सदफजा म,जावेद, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे,सभापती प,स,सौ अनिताताई दिवाकर राठोड, सुधीरभाऊ देशमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य,शिवसेना ता,प,उत्तमराव ठवकर,डॉ,विष्णू उकंडे,राहुल शिंदे,आतिष राठोड,विनोद जाधव,सह नगरसेवक,शिवसेना पद्धधिकारी उपस्थित होते,दिग्रस शहरातील व ग्रामीण भागातही जनतेनी एकच गर्दी केली,