यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील रुई (तलाव) येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पंचायत समितीवर धडक देऊन आवास योजनेच्या ‘प्रपत्र ड’ यादीत नावे समाविष्ट करावे,या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना आज दि.२४ डिसेंबर रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.

यावेळी पं. स.सभापती अनिता राठोड, माजी जि.प. सदस्य दिवाकर राठोड, ढोले साहेब, प्रा.प्रेम राठोड उपस्थित होते. निवेदनावर रुई तलावच्या सरपंच निर्मला डांगरे, उपसरपंच नितीन पवार, मयाराम झाडे, साहेबराव जिजोरे, सुनिल राठोड, काशिनाथ नाटकर, चंद्रभान साबळे,उत्तम मस्के,उत्तम झाडे,बाबूसिंग झाडे, रवी चव्हाण, गोपीबाई आडे,माणिक काटकर,राजेश व्यवहारे यांच्यासह रुई तलाव येथील अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *