यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नितीन भूतडा हे महागावमधून निवडून आले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी महागावमधून एकतर्फी विजय मिळवला होता. यापूर्वीही विविध निवडणुकांमध्ये राजकीय रणनीतीच्या जोरावर विजय मिळवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *