जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानांतर्गत कार्यक्रमाला सुरुवात
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथील भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये” जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आणि सोबतच नेहरू युवा केंद्र गडचिरोली प्रेरित छञपती युवक मंडळ लखमापुर बोरी आयोजीत तालुका क्रीडा स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती किरण ताई सुरजागडे प्रमुख अतिथी डाॅ.टी.एम.दूधबळे विद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेन सुपद स्वर्णकार सर, शहारे साहेब,भाग्यवान पिपरे, नामदेव सातपुते शिवणकर सर ,कैथल सर , शेंडे सर, पेन्दोर सर,पाल सर , बानबले सर , बुरमवार सर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लोथे सर , दिलखुश बोदलकर तर आभार शेंडे सर यांनी मानले.
भास्कर फरकडे
एन.टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली