section and everything up until
* * @package Newsup */?> अहमदनगर : यश अपयश पचवायची क्षमता खेळाने निर्माण होते - जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले. | Ntv News Marathi

सरकार चषक भव्य हॉली बॉलचे उपांत्यपूर्व स्पर्धेचे उद्घाटन.

अहमदनगर : अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते स्पर्धेचे नाणेफेक करून चेंडू टोलवून सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे इक्बाल शेख, माजी क्रीडा अधिकारी अजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सुधीर चपळगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाकार्याध्यक्ष अभिजित खोसे, कासम केबालवले, प्रा.श्रीकांत निंबाळकर, प्रा.राजेंद्र धिरडे, डॉ अनिल बोरगे, राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र सुद्रीक, आनंद सप्रे, संजय क्षीरसागर, इम्रान सय्यद,अरबाज बागवान, सोफियान शेख, दानिश हुंडेकरी, पंकज ओहोळ, अभिजित खरपुडे, सुदर्शन ढवळे, सैफ शेख,रहीम शेख, आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाले की शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, खेळाडूंना व विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच मैदानी खेळाणे युवकांचा सर्वांगीण विकास होतो. रोगप्रतिकारशक्‍ती वाढीस लागते व मन प्रसन्न राहून, शरीर सुदृढ बनते. खेळाडू हा कोरोना मध्ये दिवसभर घरामध्ये बसून मोबाईलच्या आहारी गेला असून अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने बाहेर काढण्याचे काम केले आहे. तसेच यश-अपयश पचवायची क्षमता खेळाडूंना खेळामुळेच निर्माण होते. व आता मोबाईलकडे वळालेली युवा पिढी मैदानी खेळाकडे वळताना दिसत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात अभिजित खोसे म्हणाले की मोबाईलचा अतिरिक्त वापर ऐवजी मैदानी खेळाकडे मुलांचा कळ वाढावा राष्ट्रीय एकात्मता अखंडित राहावी बंधुत्व व सामाजिक जातीय सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने अहमदनगर शहरात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारी संस्था अनंत बहुउद्देशीय सेवा संस्था द्वारे सरकार चषक भव्य हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. शहरांमध्ये लीग स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली असून दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असून पुढच्या महिन्यात देखील सहकार क्रीडा मंडळाच्या वतीने आमदार चषक घेण्यात येणार आहे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नगर शहरातील मैदाने विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच मैदानावर विनामूल्य किंवा अल्पदरात प्रशिक्षक उपलब्ध करण्याची मागणीदेखील करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार सुधीर चपळगावकर यांनी मानले तर सूत्रसंचालन अतुल सारसर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *