अहमदनगर – मूळचे अहमदनगर येथील आसीफ़ उमर सय्यद हे सोलापूर महानगर पालिका येथे आरोग्य निरीक्षक पदावर सेवेत होते.
नुकतेच ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला असुन सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महानगर पालिका आयुक्तांसह,अधिकारी कर्मचारी यानी त्यांच्या कार्यपद्धती बद्दल बोलताना सआश्रु नयनांनी श्रध्दांजली व्यक्त केली .त्यांचे पार्थिव सोलापूर येथून अहमदनगर येथे आणण्यात आले. त्यांच्या कुटूबीयासह, आप्त,नतेवाईकांच्या उपस्थितित अहमदनगर येथे अंत्यविधी करण्यात आला.पत्रकार सय्यद वहाब यांचे ते बंधु होत.