नगरदेवळा येथील पिंपळगाव शिवारात उमेश सीताराम महाले यांच्या गट क्रमांक २९९/१ मधील शेतात तब्बल ११ फुटांचा अजगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
अजगर दिसताच नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या शिताफीने अजगराला सुरक्षितपणे पकडले.
दरम्यान, अजगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजगर सुरक्षितपणे पकडल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
