यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीकडून सामाजिक बांधिलकी जपत ९० दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष मदत मिळावी, या उद्देशाने साकळी ग्रामपंचायतीकडून गेल्या एक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. किराणा किट मिळाल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर, मुकेश बोरसे, खतीब तडवी, अकबर हुसेन शेख, उमेश बडगुजर, मुकेश खेवलकर आणि योगेश कुंभार यांच्यासह माजी सदस्य, नागरिक, अपंग संघटनेचे अध्यक्ष वासुदेव बडगुजर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांच्या अडचणींमध्ये आधार देणे, हेच लोकसेवेचे कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा ‘मदतीचा हात’ कायम राहणार असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
