सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीरात 473 रुग्णांची तपासणी
अहमदनगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी शिक्षणासाठी दिलेले बलिदान हे असमान्य असेच आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला त्यागामुळे आजची स्त्री मुक्तपणे सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवित आहेत. त्यांचा आदर्श आपण घेऊन समाजाचे देणे लागतो, या भावनेतून काम केले पाहिजे. फिनिक्स फौंडेशनच्यावतीने सातत्याने आरोग्य क्षेत्रात सुरु असलेल्या शिबीराच्या माध्यमातून जनसेवा ही दिशादर्शक अशीच आहे. गरजूंच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम करत आहे. गेल्या अनेक वर्षे एखाद्या उपक्रमात सातत्य ठेवणे ही खरोखर अतुलनिय गोष्ट आहे, अशा कार्याचा आपणही आदर्श घेऊन समाजात काम केले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता इंजि.अरुण नाईक यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त नागरदेवळे येथे फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता इंजि.अरुण नाईक यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नगर तालुका पो.नि.राजेंद्र सानप, नागरदेवळेच्या सरपंच सविता पानमळकर, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रा.अमोल खाडे, वसंत कापरे, राजेंद्र बोरुडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी पो.नि. राजेंद्र सानप म्हणाले, गोर-गरीबांना आरोग्य सेवा पुरविण्याचे पुण्यकर्म जालिंदर बोरुडे फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून करत आहे. महाग होत असलेल्या आरोग्य सेवेत मोफत शिबीराच्या माध्यमातूनचे हे सेवा कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रास्तविकात फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले, समाजातील दुर्लक्षित, वंचितांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. त्यात शारीरिक व्याधींमुळे अनेक त्रास्त आहेत, अशा परिस्थितीत मोफत शिबीराच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे, हे आमचे भाग्य समजातो.
नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियामुळे अनेकांना दृष्टी देण्याचे काम फौंडेशनच्यावतीने आम्ही करत आहोत. या कार्यात सर्वांचे सहकार्याने हे कार्य असेच पुढेही सुरु राहिल असे सांगितले. या शिबीरात डॉ.विशाल घंगाळे, सचिन सोनवणे, सिस्टर माया आल्हाट आदिंनी रुग्णांची तपासणी केली. या शिबीराचा 473 रुग्णांनी लाभ घेतला तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 93 रुग्णांना पुणे येथील बुधराणी रुग्णालयात पाठविण्यात आले. कार्यक्रमासाठी ओम बोरुडे, जगदीश बोरुडे, जय बोरुडे, सौरभ बोरुडे आदिंनी परिश्रम घेततले. सूत्रसंचालन प्रा.अमोल खाडे यांनी केले तर आभार गौरव बोरुडे यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.