नागपुर : पोलीस हे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात त्यांना कायद्याच्या कसोटीतच राहून आपलं कर्तव्य बजावतात मात्र काही पोलीस अधिकारी कायद्याच्या चाकोरीत राहून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करतात मात्र याला खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव अपवाद आहेत त्याच्या कार्याला प्रभावित होऊन नुकताच रिपाई चिचोली सर्कल खापरखेडा च्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव १ जानेवारी २०२२ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्यात रुजू झाले मात्र त्यांनी फार कमी वेळात आपल्या कार्याचा ठसा उमटविला पूर्वी ते पारशिवनी पोलीस ठाण्यात कार्यरत होते खापरखेडा पोलीस ठाण्यात रुजू होताच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सामान्यांप्रती असलेली आत्मियता त्यांनी दाखवून दिली आहे मागील दोन महिन्यात काही सामाजिक व राजकीय संघटनेने आंदोलन उभारले मात्र त्यांनी संबंधित विभागाशी यशस्वी पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न निकाली काढण्यात मोलाची भूमिका बजावली सर्वच आंदोलन यशस्वी होतात असं नाही पण त्यात सर्व सामान्य नागरिकांसह पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते हे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
रिपाईने मागील काही दिवसात विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चक्काजाम आंदोलन उभारले होते मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन कर्ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते मात्र पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तोडगा काढला त्यांच्या कार्याची दखल घेत रिपाईने चिचोली सर्कल महासचिव सुमेध चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी मुकेश बागडे, प्रशांत पाटील, सुभाष मेश्राम, मनोज बेरड, विजय निकोडे, प्रितम सोमकुवर, चक्रपाल पाटील, मंगेश सोनटक्के, सोनू गणवीर, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.