नागपूर : सावनेर तालुक्यातील चनकापूर येथील स्व. लक्ष्मीलाल कनोजिया कनिष्ठ महाविद्यालय मधील विज्ञान व वाणिज्य शाखेच्या वर्ग १२वीचा १०० टक्के निकाल लागला आहे. सदर महाविद्यालयातील एकूण ११० विद्यार्थ्यांपैकी सर्व ११०विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व ११० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागलेला आहे.
विज्ञान शाखेतील ऋतुज घुंग्रुड या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५५१ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची टक्केवारी ९१.८३आहे, तसेच कुमारी रितिका त्रिवेदी या विद्यार्थिनीने ६०० पैकी ५४७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला असून तिच्या गुणांची टक्केवारी ९१.१७ आहे, तसेच कुमारी मुसफेरा अन्सारी या विद्यार्थिनीने ६०० पैकी ५४६ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला तिच्या गुणांची टक्केवारी ९१.०० आहे. तसेच नंदिनी कुशवाह हिची टक्केवारी ९०.८३ असून तिने चौथा क्रमांक पटकाविला आहे आणि विशाल दमाहे याची ९०.१७ टक्केवारी असून याने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. एकूण ११० पैकी १०८विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा गौरव वाढविला. संस्थेचे अध्यक्ष अजय ल. कनोजिया, संस्थेचे सचिव राजेश ल. कनोजिया, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण सा. मिश्रा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाहीद खान, भूषण खंगारे, निलेश धानोरे, अरुंधती नेमाडे, दीक्षा चौधरी या सर्वांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.