नागपूर : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत उपमुख्य अभियंता शरद रामजी भगत यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती झाली असून भगत यांना नागपूर येथील प्रादेशिक सौर कार्यालयात तर अधीक्षक अभियंता डॉ. अनिल काठोये यांची उपमुख्य अभियंता म्हणून पदोन्नती होऊन खापरखेडा येथेच नेमणूक झाल्याबद्दल खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या अध्यक्षतेत व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत “चमरी” येथे घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शरद भगत व डॉ. अनिल काठोये यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंतागण अरुण पेटकर, जितेंद्र टेंबरे, अधीक्षक अभियंतागण संजय तायडे, संजयकुमार पखान, विश्वास सोमकुवर, संदीप देवगडे, लेखा सहायक महाव्यवस्थापक नितीन सूर्यवंशी, कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे महासचिव दिवाकर घेर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमरचंद जैन यांनी मानले.
याप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक झिंगरे, शामराव सरोदे, हेमराजसिंह परिहार, मनोज डेविड, विनोद बरडे, रमेश लोणारे, भरत पटेल, अनिल भोयर, महेश अढाऊ, रामचंद्र जोगे, मोहनदास, केवल मेंढे, गणेश लोणारे, अशोक वंजाळ, राजू गभने, कबीर हुसेन, राजू लोणारे, अरविंद चिकनकर, अशोक शर्मा, राजीक पठाण, दिनेश लोडेकर, मनीष धोटे, दिलीप ढगे, किशोर लाडकर, राहुल जालंदर, जयंत झिंगरे, राजू ढोके, केशव पानतावणे, पुरुषोत्तम चहाकर, सूरज भारद्वाज, नरेश पानतावणे, संतोष पाटील, भीवा तांडेकर, विनोद तिखे,उमेश गजभिये आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
