नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न खापरखेडा पत्रकार संघाच्या वतीने चिचोली व वलनी सर्कल परिसरातील शाळा महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क नोटबुक व शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून खापरखेडा पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
चिचोली व वलनी सर्कल परिसरातील शाळा महाविद्यालयात शेकडो गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे पालकांची आर्थिक व्यवस्था कमकुवत असल्यामूळे सदर विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवीत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यांचे मनोबल उंचाविणे आवश्यक असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळाची गरज आहे.
अश्या विद्यार्थ्यांना पाठबळ मिळावं त्यांनी शाळेत जावं, त्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून द्यावं या संकल्पनेतून नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न खापरखेडा पत्रकार संघाने ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून
चिचोली व वलनी जिल्हा परिषद सर्कल परिसरातील शाळा महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क नोटबुक व शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम स्वातंत्रदिन १५ आगस्ट रोजी राबविण्यात आला.
डी ए व्ही प्राथमिक शाळा खापरखेडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरखेडा, महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा आदि शाळेत नोटबुक व शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून उर्वरित शाळामध्ये १७ आगस्टला नोटबुक व शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर, कार्याध्यक्ष केशव पानतावणे, उपाध्यक्ष प्रकाश गजभिये, सरचिटणीस कपिल वानखेडे, कोषाध्यक्ष विनोदकुमार गौतम, जेष्ठ पत्रकार दिवाकर घेर, जिल्हा प्रतिनिधी अमर जैन यांच्यासह खापरखेडा पत्रकार संघाचे सदस्य बंडूभाऊ चौरागडे, क्रिष्णा नमलेवार, डॉ.अहमद शेख, सुरेश वानखेडे, गिरधारी शर्मा, मनोज डेविड, श्रीकांत जालंदर, अरविंद सरोदे, राजेश खंडारे, सचिन कोरडे, अभय मिश्रा, राज तांडेकर, प्रमोद येवले, मुकेश बागडे, शुभम वाकपांजर आदि उपस्थित होते.
खापरखेडा-प्रतिनिधी