नागपूर : सत्र २०२१-२०२२ मध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळेंना स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन करून ऑनलाईन माहिती व फोटो अपलोड करणे होते. यामध्ये एकूण ५९ मुद्दे होते. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळेंनी नोंदणी केली होती. त्याची प्रत्यक्ष तपासणी, वस्तूनिष्ठ मूल्यमापन व पडताळणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्या पडताळणीमध्ये नागपूर जिल्ह्यातून खाजगी अनुदानित शाळेतून महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा या शाळेने- (१)कोविड-१९ ची खबरदारी व प्रतिसाद, (२) पाणी, (३) स्वच्छता गृहे, (४) हातधूणे, (५) देखभाल व व्यवस्थापन, (६) वर्तनबदल व क्षमता विकसन या सहाही मूल्यांकन श्रेणीत ९८% गुण संपादन केले तर सर्व समावेशक (Overall) स्वच्छ विद्यालय पुरस्काराच्या मुल्यांकनातही ९८% गुणांकन प्राप्त करून खाजगी अनुदानित गटात नागपूर जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आज स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त – जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड व उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार यांना माननीय जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प. शिक्षण सभापती भारती पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उप कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार व संयोजक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख संजय गुंजारकर आवर्जून उपस्थित होते.


प्रतिनिधी नागपूर

विनोद गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *