गडचिरोली : अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन राजाराम जागतिक महिला दिनानिमित्त” मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सा., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री अनुज तारे सा. संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली “पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य बेबी मडावी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


सदर महीला मेळाव्याची सुरुवात मौजा राजाराम येथील महीला वकिल श्रीमती रुपाली गेडाम व भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथील अधिक्षिका श्रीमती होके मॅडम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार व भेटवस्तू , हद्दीतील आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना भिंतीवरील घड्याळ तसेच आश्रम शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. हद्दीतील नदिगाव व गोलकरजी या गावातील हॉलीबॉल व क्रिकेट संघांना हॉलीबॉल ,नेट व क्रिकेट बॅट वाटप करण्यात आले. तसेच कॅलेंडर वाटप करण्यात आली. सदर मेळाव्यासाठी उप पोस्टे राजाराम हद्दीतील 100 ते 125 महीला व नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिकांचेसाठी आरोग्य कॅम्पचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच सदर महीला मेळाव्या दरम्यान सर्व उपस्थित महिलांना पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उप पोलीस स्टेशन राजाराम खां चे प्रभारी अधिकारी API भोरे यांनी केले आहे. सदर मेळावा यशस्वीतेसाठी PSI विजय कोल्हे, केशव केंद्रे SRPF चे PSI सानप तसेच जिल्हा पोलीस अंमलदार, SRPF अंमलदार व CRPF अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *