नांदेड : शहरातील प्रभाग क्रमांक दोन वंजारगल्लीत गटारी तुबल्या व परिसरात जिकडेतिकडे अस्वच्छता पसरले यामुळे डासांचा प्रमाणात वाढ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी गल्लीतील गटारी व परिसर स्वच्छ करण्यात यावे अशा आशेचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना शिवकुमार खांडरे यांच्यावतीने देण्यात आले.

शहरातील काही प्रभागात विशेष करून प्रभाग क्रमांक दोन वंजारगल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या तुबल्या आहे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे यामुळे जनतेचा आरोग्याचा प्रशन निर्माण होण्याची डाट शक्यता आहे.व शहरातील स्वच्छता अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छालय सद्या बंद अवस्थेत आहे.तरी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावे.व सार्वजनिक स्वच्छालय नागरीकासाठी खुले करण्यात यावे.तसेच डासावर जंतूनाशक फवारणी करण्यात यावे.अशा आशेचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.यावेळी नगर परिषद अधिक्षक निरावार,जेष्ठ कारकून गंगाधर पत्की यानी स्वीकारले यावेळी पत्रकार दिनांबर मधुकरराव कडे ,साई भोकरे, शिवकुमार शंकर गंगोने,संजय आफूलवार, सय्यारण गणपत भोरे उपस्थित होते.
निवेदनावर त्यांचे स्वाक्ष-या आहे.