नांदेड : किनवट तालुक्यातील रोडानाईक तांडा येथे.. दि. ६ जुलै रोजी .घरात काम करत असताना येथील महिला शेषिकलाबाई गणपत आडे, वय ५३ वर्ष याला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..

सध्या शेतात शेतकऱ्याने काही दिवसाखाली पेरण्या उरकवल्या असून ,भल्या पहाटेच्या न्हारी पासून संध्याकाळपर्यंत शेतकरी शेतात राब- राब करतोय सगळ्या कामाचे डोळ्यासमोर आरसा, ठेवत शेषिकलाबाई सकाळी सकाळी काम उरकवत शेतात जायचं घाईत काम उरकवत होती. घरात काम करत असताना शॉप लागून ते बेशुद्ध पडल्या त्यानंतर घरच्या मंडळीने उपचारासाठी ईस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले .या घटनेची माहीती पोलीस पाटील शिवराम जाधव , व, सरपंच , प्रकाश राठोड,यानी ईस्लापूर पोलीस ठाण्यात कळवली असून, ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंदही करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणी डॉ. शिंदे यानी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *