नांदेड : गेल्या दोन वर्षाखाली महाराष्ट्रासह भारत,देशात थैमान घातलेल्या अपदा कोरोना, महामारीमुळे काही धार्मिक सणाला ग्रहणचं लागले होते. एकीकडे शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत चारचं भिंतीत आगामी सण साजरे करा असे आदेश मागच्या दोन-तीन वर्षात सतत पाहावास मिळाले, आता येणाऱ्या आगामी सणात काही निर्बंध हटवल्याने येणाऱ्या सण, मोठ्या उत्साहात साजरे होतील असे, दिसत आहे.
त्यातच प्रथम सण श्रावण, मासात येणारा पहिला सण म्हणजे बैलपोळा, शेतकऱ्याचा सण, याचं सर्जा -राजाच्या भरोष्यावर बळीराजा लाखोचे बियाने काळी मातीत टाकुन वर्षभराचे जुगार खेळतो..? वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैल, शेतात राबराब करणाऱ्या बैलाची पूजा ,करण्याचा हा सण ग्रामीण भागात आजही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. प्रथम दिवस म्हणजे बैलपोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांना नदी ओढ्यावर नेऊन आंघोळ घातली जाते रात्रीला हळद व तुपाने खांदे शेकल्या जाते. त्याला खांद शेकणे किंवा खांदमोडी म्हटले जाते. शेवटी पुजा होऊन , आज अवतान उद्या जेवायला हो….असे म्हटले जाते दुसऱ्या दिवशी बैलांना सजवण्यासाठी झाली, बाशिंग, बेगड ,पंखे, घुंगरू, माळी , रंगीन चवाळे,शिंगाला तिरंगी पेंट, आदी मोठी सजावट शेतकऱ्याकडुन बैलासांठी केली जाते.मोठ्या उत्साहाने शेतकरी वर्ग बैलपोळा सण मोठ्या थाटात साजरा करतात..